मुंबई

Mukesh Ambani: कुठे सापडली 'ती' पांढरी इनोव्हा कार, वाचा सविस्तर

पूजा विचारे

मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली जी स्कॉर्पिओ कार पोलिसांना सापडली होती. या स्कॉर्पिओ बरोबरच एका इनोव्हा कारचा देखील समावेश होता. त्यानंतर पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून या कारचा शोध घेत होते. दरम्यान ती कार मध्यरात्री पोलिसांच्या हाती लागली आहे. 

सचिन वाझे यांच्या चौकशीनंतर NIA नं ही कार ताब्यात घेतली आहे. असं बोललं जात आहे की, या संपूर्ण प्रकरणात आता अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाणार आहे. 

NIAने ताब्यात घेतलेली  पांढऱ्या रंगाची कार ही काल रात्री मुंबई पोलिस आयुक्तालयातून ताब्यात घेतल्याचं माहिती सुत्रांनी दिली आहे.  ही कार गेल्या अनेक दिवसांपासून आयुक्तालय परिसरातच उभी असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.  या कारच्या मागे मुंबई पोलिस असं लिहिलं आहे.

ही कार CIU पथकाची असल्याचे तपासात समोर आले असून  सचिन वाझे ही कार वापरत होते. ही कार गुन्ह्यात वापरली असल्याचा संशय NIA ला आहे. त्यामुळे सीआययूच्या अधिकाऱ्यांची देखील या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

सचिन वाझे यांनी स्फोटक बाळगळल्याचा आरोप NIA ने केला असून लवकरच पांढऱ्या रंगांच्या इनोव्हाचा लेखाजोखा एनआयए आज जाहीर करणार आहे.

सचिन वाझे यांना NIA कडून अटक 

मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना  एनआयएकडून अटक करण्यात आली आहे. शनिवारी तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक केली आहे. मुकेश अंबानी यांच्या घरबाहेर गाडीत स्फोटकं सापडलेल्या प्रकरणात वाझे यांची चौकशी करून त्यांना अटक करण्यात आलीय.

Mukesh Ambani NIA Found White Innova car after sachin waze arrest

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू, उज्ज्वल निकम कोर्टात हजर

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT